बेस्ट वरच्या जाहिराती काढा नाहीतर…- जितेंद्र आव्हाड…

मुंबई – बेस्ट बसवर लावण्यात आलेल्या जाहिरातींवरुन राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड चांगलेच आक्रमक झाले आहेत. हा मराठी माणसाच्या हृदयाला काढलेला चिमटा आहे. या बेस्ट बसवरील जाहिराती काढा नाहीतर बेस्ट फोडणार, असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.

याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केले आहे. एकीकडे सीमा भागात राहणाऱ्या मराठी बांधवांवर अत्याचाराची मालिका सुरू आहे. आरोग्य सेवा लागू करू देणार नाही असे कर्नाटकने सांगितले. त्याच कर्नाटकला छाताडावर बसवण्याचे काम सरकार करत आहे. बेस्ट बसवर चला कर्नाटक बघुया अशा प्रकारे जाहिरात करण्यात आली आहे. मराठी माणसाच्या हृदयाला काढलेला चिमटा आहे. बेस्ट वरच्या जाहिराती काढा नाहीतर मराठी माणूस बेस्ट फोडणार. मुंबईची जनता रस्त्यावर उतरणार असे आव्हाड यांनी ट्विट मध्ये म्हंटले आहे.