महाराष्ट्र

लाच घेताना पोलीस हवालदाराला रंगेहाथ पकडले…

सोलापूर – ४० हजाराची लाच घेताना एका पोलीस हवालदाराला रंगेहात पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर यांनी हि कारवाई केली. हर्षवर्धन हरिशचंद्र वाघमोडे असे या हवालदाराचे नाव असून तक्रारदार यांच्याकडे ५०,०००/- रुपये लाचेची मागणी करुन तडजोडअंती ४०,०००/- रुपये लाच घेताना त्यांना एसीबीने रंगेहात पकडले.

याबाबत वृत्त असे आहे कि, तक्रारदार व त्यांचे नातेवाईक यांच्यावर बार्शी तालुका पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण येथे गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हयामध्ये तक्रारदार व त्यांचे नातेवाईकांना अटक करुन तात्काळ जामीनावर सोडण्याकरीता आणि सदर गुन्हयामध्ये मदत करण्याकरीता पोलीस हवालदार वाघमोडे यांनी ५०,०००/- रुपये लाचेची मागणी करुन, तडजोडीअंती ४०,०००/- रुपये लाच घेताना त्यांना एसीबीने रंगेहात पकडले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page