मुंबई
जबरी चोरी,घरफोडी करणारा अटक…

मुंबई – जबरी चोरी व घरफोडी करणाऱ्यास नवघर पोलिसांनी अटक करून ५ गुन्हे उघडकीस आणले. विवेक तोरडे असे याचे नाव आहे.
फिर्यादी राहुल हरिजन यांच्या घरातून फिर्यादी यांचा मोबाईल जबरी चोरी करून तसेच रोख रक्कम ५,०००/- रुपये असे चोरी झाल्याबाबत नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे विवेक तोरडे यास अटक केली. त्याच्याकडून चोरी केलेले ७०,०००/- रुपये किंमतीचे एकूण ९ मोबाईल, रोख रक्कम रु.५०००/- असा एकूण ७५,०००/- रुपये किंमतीचा मुददेमाल आणि गुन्हा करण्याकरीता वापरण्यात आलेले हत्यार हस्तगत केले. तसेच नवघर पोलीस ठाण्यातील एकूण ५ गुन्हे उघडकीस आणले.