डोंबिवलीत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश…

डोंबिवली – पूर्वेतील हेदुटणे गावात सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा मानपाडा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी सदर गावात छापा टाकून ७ बांग्लादेशी महिलांची सुटका केली आहे. तसेच ५ बांग्लादेशींसह एका भारतीय इसमास अटक केली.
युनूस अखमल शेख उर्फ राणा, साहिल मिजापुर शेख, फिरदोस नुर हुसेन सरदार, आयुबअली अजगरअली शेख, बिपलॉप हापीजूर खान आणि योगेश बळीराम काळण (भारतीय) अशी यांची नावे आहेत.

याबाबत वृत्त असे आहे कि, राणा नावाच्या इसमाने एका १९ वर्षीय बांग्लादेशी महिलेस नोकरीला लावण्याच्या बहाण्याने बांग्लादेशमधून भारतात आणून हेदुटणे गावात तिला खोलीत डांबून ठेऊन तिच्यावर वारंवार लैगिंक अत्याचार केले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
त्यानुषंगाने पोलिसांनी हेदुटणे गावातील विठ्ठल रूक्मीणी मंदीराजवळ असलेल्या एका घरात छापा टाकून पीडित महिलेसह ७ महिलांची सुटका केली. तसेच ५ बांग्लादेशी आरोपींसह बांग्लादेशींना घर देणारा इसम योगेश बळीराम काळण याला देखील अटक केली. याप्रकरणी पोलिसांनी २५ संशयित आधार कार्ड, १० पॅनकार्ड, ४ जन्मतारखेचे दाखले तसेच बांग्लादेश आणि भारताच्या चलनी नोटा जप्त केल्या.
सदरची यशस्वी कामगिरी दत्तात्रय शिंदे अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, कल्याण, सचिन गुंजाळ, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३ कल्याण, सुनिल कुराडे सहाय्यक पोलीस आयुक्त, डोंबिवली यांच्या मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे, पोनि सुरेश मदने, पोनि राम चोपडे, पोनि दत्तात्रय गुंड, सपोनि अविनाश वनवे, सपोनि सुनिल तारमळे, सपोनि प्रशांत आंधळे, सफी संतोष चौधरी, पोहेकॉ राजेंद्र खिलारे, पोहेकॉ संजु मासाळ, पोहेकॉ सुनिल पवार, पोहेकॉ विकास माळी, पोहेकॉ शिरीष पाटील, पोहेकॉ दिपक गडगे, पोना यल्लप्पा पाटील, पोना देवा पवार, मपोहेकॉ इरपाचे, पोना मंदार यादव, पोकॉ महेंद्र मंझा, पोकॉ बहीरम, पोकॉ राठोड, पोकॉ जाधव, पोकॉ नरूळे, पोकॉ विजय आव्हाड, पोकॉ अशोक अहेर, सफौ धनंजय मोहीते, सफौ दिपक भोसले (A.H.T.U THANE) यांनी केली.