महाराष्ट्र

चैन स्नॅचिंग करणारे दोघे अटकेत…

पनवेल – चोरीची मोटार सायकल वापरून महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरीने खेचून नेणाऱ्या दोघांना गुन्हे शाखा, कक्ष २ पनवेल पोलिसांनी अटक केली. केविन उर्फ मोहम्मद सादक जाफरी आणि हाथी उर्फ कैलास नेपाळी अशी या दोघांची नावे आहेत.

पोलिसांनी कळंबोली पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे केविन उर्फ मोहम्मद सादक जाफरी यास अटक करून त्याच्याकडून ५०,०००/- रु. किंमतीचे १२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र जप्त करून विविध पोलीस ठाण्यातील चैन स्नॅचिंग आणि मोटार सायकल चोरीचे एकूण ६ गुन्हे उघडकीस आणेल.

तसेच रबाळे पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करून पोलिसांनी हाथी उर्फ कैलास नेपाळी यास अटक करून विविध पोलीस ठाण्यातील चैन स्नॅचिंग आणि मोटार सायकल चोरीचे एकूण ११ गुन्हे उघडकीस आणेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page