विविध गुन्ह्यातील आरोपींना मुद्देमालासह अटक; कोपरखैरणे पोलिसांची दमदार कामगिरी…

नवी मुंबई – कोपरखैरणे पोलिसांनी चैन चोरी, स्टिल चोरी आणि गांजा विक्री अशा विविध गुन्ह्यातील एकूण ७ आरोपींना मुद्देमालासह अटक केली.
पोलिसांनी गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे चैन जबरी चोरीचा सराईत गुन्हेगार मोहम्मद अफाक इशाक शेख यास अटक करून त्याच्याकडून मोटार सायकल आणि सोन्याचे मंगळसूत्र (५ ग्रॅम ५ मिलीग्रॅम वजनाचे) रु. १,५०,०००/- किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.

कोबिंग ऑपरेशन दरम्यान करण्यात आलेल्या कारवाईमध्ये अनिल उमराव शिंदे, रादुबाई बलभीम काळे, सिमा शिवाजी पवार, सुरेखा अतुल शिंदे यांना बालाजी एक्झाटीका बिल्डिंग समोरील झोपडपट्टी सेक्टर ९ कोपरखैरणे नवी मुंबई येथे अटक करून त्यांच्याकडून रु. ३,६३,६००/- किंमतीचा २० किलो २०० ग्रॅम वजनाचा ‘गांजा’ हस्तगत केला.
तसेच कोपरखैरण रेल्वे स्टेशनसमोरील, सेक्टर ५, कोपरखैरणे, नवी मुंबई येथे गटारीचे बांधकामाकरीता आणलेले रु. ५०,०००/- कि. चे ५०० किलो वजनाचे जे एस डब्लु स्टिल चोरीबाबत कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे अनस नजीर खान, गुफरान मेराज खान या दोघांना अटक करून त्यांच्याकडून गुन्हयातील सर्व मुद्देमाल हस्तगत केला.