मुंबई
मंत्रालयातील सुरक्षा जाळीवर…

मुंबई – मंत्रालयातील सुरक्षा जाळीवर एका तरुणाने उडी मारून आंदोलन केले असल्याचे समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रखडलेली शिक्षक भरती लवकर सुरु करावी तसेच कंत्राटी भरती प्रक्रीया राबवू नये यासाठी या तरुणाने मंत्रालयातील संरक्षण जाळीवर उडी मारली. त्यावेळी या तरुणाने जोरदार घोषणाबाजी देखील केली.

दरम्यान, पोलिसांनी या तरुणाला जाळीबाहेर काढून ताब्यात घेतले आहे.