डोंबिवली

डोंबिवलीत लॉजमध्ये सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश…

डोंबिवली – डोंबिवली पूर्वेतील लॉजिंग अँड बोर्डिंगमध्ये सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा ठाणे क्राईम ब्रांचने पर्दाफाश केला आहे क्राईम ब्रांचने या लॉजिंग अँड बोर्डिंगवर टाकलेल्या छाप्यात ४ जणांना अटक करून, एका पीडित मुलीची सुटका केली.

डोंबिवली पूर्वेतील मानपाडा पोलीस स्टेशन हद्दीत कटई टोल प्लाजा, लोढ़ा पालावा जवळील आमंत्रण लॉजिंग बोर्डिंगमध्ये सेक्स रॅकेट चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

त्याआधारे पोलिसांनी सदर ठिकाणी बोगस गिर्हाईकद्वारे सापळा रचून, छापा टाकला आणि १ मॅनेजर, २ वेटर, १ एजेंट अशा एकूण ४ जणांना अटक केली तसेच एका पीडित मुलीची सुटका केली. दरम्यान, चालक आणि मालक फरार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page