ठाणे

१५ लाखांची लाच घेताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात…

ठाणे – गुन्ह्यात जामीन मिळवून देण्यासाठी आणि अटक न करण्यासाठी मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकाने ५० लाख रुपये लाचेची मागणी केली. त्यापैकी १५ लाख रुपये लाच घेताना भाईंदर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदाराला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. गणेश वणवे असे या पोलीस हवालदाराचे नाव आहे तर महेंद्र शेलार असे पोलीस निरीक्षकाचे नाव आहे.

तक्रारदार व त्यांचे अशिल यांना गुन्ह्य़ात जामीन मिळवून देणे, अटक न करणे अशा प्रकारची मदत करण्यासाठी महेंद्र शेलार यांनी तक्रारदार यांचेकडे ५० लाख रू ची मागणी केली व तडजोडीअंती ३५ लाख रू घेण्याची तयारी दाखवून पहिला हप्ता १५ लाख रू पोलीस हवालदार गणेश वणवे यांनी घेतला असता, त्यांना एसीबीने रंगेहात पकडले तसेच पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार आणि पोलीस हवालदार गणेश वणवे यादोघांविरुद्ध मिरा रोड पोलीस स्टेशन, मि. भा. व. वि आयुक्तालय येथे गुन्हा दाखल करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page