ठाणे
उल्हासनगर मधील एका कंपनीत भीषण स्फोट!…

उल्हासनगर – उल्हसनगर परिसरातील सेंच्युरी रेयॉन कंपनीतील CS2 डिपार्टमेंटमध्ये भीषण स्फोट झाल्याची घटना घडली असून, या घटनेत ४ ते ५ कामगारांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर अनेक कामगार जखमी झाले आहेत.

हा स्फोट इतका भयंकर होता की, आजूबाजूच्या परिसरातील घरांना हादरे बसलेले आहेत. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून, बचावकार्य सुरू आहे.