अट्टल सोनसाखळी चोरास अटक…

ठाणे – अट्टल सोनसाखळी चोरास ठाणे गुन्हे शाखेच्या मालमत्ता गुन्हे कक्ष पथकाने अटक केली. मुसा रजा सय्यद असे याचे नाव असून पोलिसांनी ३ गुन्हे उघडकीस आणले.
ठाणे शहरात सोनसाखळी आणि मोटार सायकल चोरीच्या घटनेत वाढ झाली होती. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे मुसा रजा सय्यद यास सोनसाखळी आणि मोटार सायकलसह अटक केली. सदर प्रकरणी पोलिसांनी जबरी चैन चोरीचा १ आणि मोटार सायकल चोरीचे २ गुन्हे उघडकीस आणून एकूण १,५५,०००/- रु. किंमतीची मालमत्ता हस्तगत केली.
सदरची यशस्वी कामगिरी ठाणे शहर पोलीस आयुक्त जयजीत सिंग, पोलीस सह आयुक्त दत्तात्रय कराळे, अपर पोलीस आयुक्त डॉ. पंजराव उगले, पोलीस उप आयुक्त शिवराज पाटील (गुन्हे) सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता गुन्हे कक्ष पथकाचे वपोनिरी आनंद रावराणे, सपोनि जगदीश मुलगीर, महेश जाधव, पोलीस अंमलदार स्वप्नील प्रधान, राजेंद्र घोलप, संदीप भालेराव, प्रशांत भुर्के, राजाराम शेगर, रूपवंत शिंदे, नगराज रोकडे, किशोर भामरे, राजकुमार राठोड, नवनाथ कोरडे, सदन मुळे आणि महिला पोलीस अंमलदार आशा गोळे, गीताली पाटील यांनी केली.