महाराष्ट्र
ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे निधन…

कोल्हापूर – मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे निधन झाले आहे. ८८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपासून ते आजारी होते. कोल्हापूर येथील राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली.
भालचंद्र कुलकर्णी यांनी नाटक ते चित्रपट दोन्ही क्षेत्रात आपली छाप पाडली आहे. मराठीतील अनेक चित्रपटांमध्ये सहाय्यक अभिनेत्याची भूमिका साकारत लोकांच्या मनावर आपला ठसा उमठवला आहे. त्यांनी ३०० हून अधिक चित्रपटात काम केले होते. तसेच अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते. मुंबईचा जावई, सोंगाड्या, खतरनाक, असला नवरा नको गं बाई, थरथराट हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट आहेत.