नवी मुंबई
सिडकोचा क्षेत्र अधिकारी एसीबीच्या जाळ्यात…
नवी मुंबई – सिडकोच्या क्षेत्र अधिकाऱ्याला लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नवी मुंबई यांनी रंगेहात पकडले. मुकुंद चंद्रकांत बंडा असे याचे नाव असून ३ लाखांची लाच घेताना एसीबीने त्यांना पकडले. बंडा हे क्षेत्र अधिकारी या पदावर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सिडको नवी मुंबई (वर्ग 2) येथे कार्यरत होते.
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळ पुनर्वसन मध्ये संपादित केलेल्या घराच्या बदल्यात सिडको कडून मिळणार्या भूखंडाची पात्रता निश्चित करण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्याकरीता बंडा यांनी एकूण ७ लाख रुपये लाचेची मागणी करून त्यापैकी पहिला हप्ता म्हणून ३ लाख रुपये सिडको कार्यालय, नवी मुंबई येथे स्विकारले असता बंडा यांना एसीबीने रंगेहात पकडले.