महाराष्ट्र

महायुती सरकारचे खाते वाटप जाहीर…

nagpur – अखेर महायुती सरकारचे खाते वाटप जाहीर करण्यात आले आहे. महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर आज हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सरकारकडून राज्यमंत्रिमंडळाचं खाते वाटप जाहीर करण्यात आले.

यामध्ये गृहमंत्रालय देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:कडे ठेवलं आहे. याशिवाय गृह, ऊर्जा, न्याय व विधी, सामान्य प्रशासन, माहिती आणि जनसंपर्क व खातेवाटप न झालेल सर्वच खाते फडणवीस यांनी स्वत:कडे ठेवले आहेत. तर नगरविकास मंत्रालय एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. याशिवाय गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम विभाग ही एकनाथ शिंदेंना मिळाली आहेत. याशिवाय अर्थमंत्रालय आणि राज्य उत्पादन शुल्क ही खाती अजित पवार यांच्याकडेच राहिलं आहे.

राज्य सरकारमधील मंत्र्यांची यादी खालील प्रमाणे…

चंद्रशेखर बावनकुळे – महसूल

राधाकृष्ण विखे पाटील – जलसंपदा ( गोदावरी व कृष्णा खोरे विकास)

हसन मुश्रीफ –  वैद्यकीय शिक्षण

चंद्रकांत पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजमंत्री

गिरीश महाजन – आपत्ती व्यवस्थापन, जलसंपदा  (विदर्भ, तापी, कोकण विकास)

गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा व स्वच्छता

गणेश नाईक –  वन

दादाजी भुसे – शालेय शिक्षण

संजय राठोड – मृदा व जलसंधारण

धनंजय मुंडे  – अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण

मंगलप्रभात लोढा – कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन

उदय सामंत – उद्योग व मराठी भाषा

जयकुमार रावल – विपणन, राजशिष्टाचार

पंकजा मुंडे – पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन

अतुल सावे – ओबीसी विकास, दुग्धविकास मंत्रालय, अक्षय ऊर्जा

अशोक उईके – आदिवासी विकास मंत्रालय

शंभूराज देसाई – पर्यटन, खाण व माजी सैनिक कल्याण मंत्रालय

आशिष शेलार – माहिती व तंत्रज्ञान

दत्तात्रय भरणे – क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय

अदिती तटकरे – महिला व बालविकास

शिवेंद्रराजे भोसले –  सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून)

माणिकराव कोकाटे – कृषी

जयकुमार गोरे – ग्रामविकास, पंचायत राज

नरहरी झिरवाळ – अन्न व औषध प्रशासन

संजय सावकारे – टेक्स्टाईल

संजय शिरसाट – सामाजिक न्याय

प्रताप सरनाईक – वाहतूक

भरत गोगावले – रोजगार हमी,फलोत्पादन, मिठागरे विकास

मकरंद पाटील – मदत व पुनर्वसन

नितेश राणे – मत्स्य आणि बंदरे

आकाश फुंडकर – कामगार

बाबासाहेब पाटील – सहकार

प्रकाश आबिटकर – सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण

राज्यमंत्री …

माधुरी मिसाळ – सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण

आशिष जयस्वाल – अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय

मेघना बोर्डीकर – सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा

इंद्रनील नाईक – उच्च आणि तंत्र शिक्षण , आदिवासी विकास आणि पर्यटन

योगेश कदम  – गृहराज्य शहर

पंकज भोयर – गृहनिर्माण,गृहराज्य ग्रामीण

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page