घरफोडी करणाऱ्या सराईतास अटक…

अंबरनाथ – रात्रीची घरफोडी करणाऱ्या सराईतास शिवाजीनगर पोलिसांनी अटक करून ७७,५००/- रू. चा मुद्देमाल हस्तगत केला. तसेच ३ गुन्हे उघडकीस आणेल. प्रकाश उर्फ अभय रमेश जाधव असे याचे नाव आहे.
फिर्यादी सोनाली लक्ष्मण गवाले यांच्या घरातून २०,०००/- रू रोख रक्कम आणि ६०००/-रू. किंमतीचे ३ मोबाईल असा मुद्देमाल घरफोडी चोरी करून नेले असल्याबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे प्रकाश उर्फ अभय रमेश जाधव यास अटक केली. त्याच्याकडून ५०००/- रू. किंमतीचे २ मोबाईल, २५००/- रू. रोख रक्कम आणि ७०,०००/- रू किंमतीच्या २ स्कुटी असा एकूण ७७, ५००/- रु. किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत करून ३ गुन्हे उघडकीस आणेल.