घरफोडी करणाऱ्याकडून १२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत…

डोंबिवली – घरफोडी करणाऱ्या इसमास मानपाडा पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून एकूण १२,००,००० /- लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. तसेच १० घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले. शंकर भिमराव सुर्यवंशी उर्फ धोत्रे उर्फ चेनाळे असे याचे नाव आहे.
मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी चोरीचे गुन्हे वाढल्याने त्यानुषंगाने गुन्हे उघडकीस आणण्यासाठी विशेष मोहिम राबविण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. त्याप्रमाणे पोलिसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे शंकर भिमराव सुर्यवंशी उर्फ धोत्रे उर्फ चेनाळे यास अटक केली.
त्याच्याकडून २०० ग्रॅम वजनाचे सोने, चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण १२,००,००० /- रु चा मुद्देमाल हस्तगत केला. तसेच १० गुन्हे उघडकीस आणले. दरम्यान, त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत त्याने त्याच्या साथीदारासह मिळून मानपाडा, डोंबिवली, विष्णुनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीचे गुन्हे केल्याचे सांगितले.
सदरची यशस्वी कामगिरी दत्तात्रय शिंदे, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, कल्याण, सचिन गुंजाळ, पोलीस उप आयुक्त, परीमंडळ ३, कल्याण व सुनिल कुराडे सहाय्यक पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलीस ठाणेचे वपोनिरी. शेखर बागडे, सपोनिरी. अविनाश वनवे, सपोनिरी. सुनिल तारमळे, सपोउपनिरी. भानुदास काटकर, पोहवा खिलारे पोहवा गडगे, पोहवा ठिकेकर, पोहवा पवार, पोहवा पाटील, पोहवा माळी, पोहवा मासाळ, पोना भोईर, पोना किनरे पोना पवार, पोना पाटील, पोशि मंझा, पोशि चौधरी, पोशि आहेर, पोशि आव्हाड यांचे पथकाने केलेली आहे.