देश
रेपो रेटमध्ये 0.25 टक्क्यांनी वाढ…

नवी दिल्ली – भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये सलग सहाव्यांदा वाढ केली आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये 0.25 टक्क्यांनी वाढ केली आहे. आता रेपो रेट 6.25 टक्क्यांवरुन 6.50 टक्के झाला आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक झाली. या बैठकीत रेपो दरात 25 बेसिस पॉईंटची वाढ करण्यात आली आहे. या नव्या वाढीसह आता रेपो रेट 6.50 टक्के इतका झाला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी ही माहिती दिली. मे 2022 पासून आता पर्यंत एकूण सहा वेळा रेपो रेटमध्ये वाढ केली आहे. ही वाढ 2.25 टक्के इतकी आहे. यानंतर आता गृहकर्जे, वाहनकर्जे महागणार आहेत.