देश-विदेश

भूकंपाच्या धक्क्याने दिल्ली हादरली…

दिल्ली – दिल्ली-एनसीआरमध्ये मंगळवारी दुपारी (२४ जाने) भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमध्ये होता. भूकंपाची तीव्रता 5.8 रिश्टर स्केल इतकी सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दिल्ली-एनसीआर, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमध्ये होता आणि भूकंपाची तीव्रता 5.8 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. जमीनपासून 10 किमी खोलीवर हा भूकंपाचा केंद्रबिंदू होता.

दरम्यान, कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे समोर आलेले नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button

You cannot copy content of this page