डोंबिवलीत रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत आरोग्य तपासणी शिबीर…

डोंबिवली – रस्ता सुरक्षा अभियान २०२३ अंतर्गत डोंबिवली वाहतूक उपविभाग व AIMS हॉस्पिटल, डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यमाने वाहतूक पोलीस व रिक्षा चालक यांचे आज दि.12/01/2023 रोजी आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचे उदघाटन सुनिल कुराडे, सहा.पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग यांचे हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाला डॉक्टर मिलिंद शिरोडकर, AIMS हॉस्पीटल, प्रसिद्ध लेखक शुक्राचार्य गायकवाड, वपोनिरी सचिन सांडभोर, डोंबिवली पोलीस स्टेशन, पोलीस निरीक्षक उमेश गित्ते, डोंबिवली वाहतूक उपविभाग, क्राईम पेट्रोल मालिकेतील कलाकार सतीश नायकवाडी, सेफ्टी वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष विशाल शेटे, ए.एस.जी.आय हॉस्पिटल, डोंबिवली चे हरी पिल्लाई, ऍडव्होकेट शिरीष देशपांडे व पोलीस अधिकारी, अंमलदार व नागरीक हजर होते. यावेळी सर्व उपस्थितांना वाहतूक शपथ देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रिया कुलकर्णी यांनी केले.
