देश
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर पुढील सुनावणी 14 फेब्रुवारीला…

नवी दिल्ली – महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर पुढील सुनावणी १४ फेब्रुवारीला होणार आहे. सरन्यायाधीश वाय. एस. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी युक्तीवाद सुरु केला. सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण सात सदस्यांच्या घटनापीठाकडे देण्याची मागणी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केली. त्यावेळी न्यायालयाने ही सुनावणी १४ फेब्रुवारी रोजी घेण्याचा निर्णय दिला.
दरम्यान घटनेवर आमचं प्रेम आहे, घटनापीठ सलग सुनावणी घेईल, व्हलेंटाईन डे प्रेमाचा दिवस आहे, सगळं प्रेमानं होईल, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली.