ठाणे
मोबाईल चोरी करणारा अटकेत…

ठाणे – मोबाईल चोरी करणाऱ्या एका इसमास मालमत्ता गुन्हे शोध कक्ष, गुन्हे शाखा, ठाणे शहर पोलिसांनी अटक करून एकूण २ गुन्हे उघडकीस आणून, २८,०००/- रु. किं. चे ३ मोबाईल हस्तगत केले. खालीद अब्दूल कासीम खान असे याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी माजीवाडा ब्रिज जवळ, मुंबई नाशिक वाहीनी, कापुरबावडी, ठाणे येथून खालीद अब्दूल कासीम खान यास अटक केली. २८,०००/- रु. किं. चे ३ मोबाईल हस्तगत करून पोलिसांनी २ गुन्हे उघडकीस आणेल तसेच पुढील तपासकामी त्याला कापूरबावडी पोलीस स्टेशन येथे मुद्देमालासह ताब्यात दिले आहे.
सदरची यशस्वी कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि महेश जाधव, सपोउपनि स्वप्नील प्रधान, पोहवा घोलप, पोहवा भुर्के. पोना किशोर भामरे, चापोशि मुळे यांनी केली.