जीवाची पर्वा न करता ६ जणांचे वाचवले प्राण…

मुंबई – मुंबई पोलीस दलातील एका पोलीस कर्मचाऱ्याने आगीत सापडलेल्या सहा जणांचे प्राण वाचवले. दिपक घरत असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. दरम्यान, या घटनेची दखल मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी घेतली असून, त्यांनी दिपक घरत यांचा पाच हजार आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
या घटनेची माहिती अशी कि, दिपक हे त्यांच्या मुलाला शाळेतून घरी घेऊन जात होते. त्यावेळी कल्याण मधील सर्वोदय हाईट्स या इमारतीच्या पहिल्या मजल्या वरील एका खोलीत आग लागल्याचे त्यांना दिसले. तेव्हा दिपक आपल्या जीवाची पर्वा न करता आग लागलेल्या घरात घुसले. त्यांच्यासोबत आणखी काहीजण होते. त्यानंतर दिपक व त्यांच्यासोबत असलेल्या व्यक्तींनी आगीत सापडलेल्या ६ जणांना सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविले.
(दिपक घरत यांनी केलेल्या कामगिरीबद्दल त्यांच्या शौर्याला युवा सूत्र टीम कडून सलाम)