सोनसाखळी चोरी करणारे दोन जण अटकेत…

मुंबई – सोनसाखळी चोरी करणाऱ्या दोघांना धारावी पोलिसांनी अटक केली. १) हसन उर्फ नुर मो. शेख उर्फ पाशा आणि २) मो. रफिक हाजी मोहंमद शेख अशी या दोघांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून ५०,०००/- रु किंमतीची सोनसाखळी हस्तगत केली.
याबाबत वृत्त असे आहे कि, फिर्यादी हे धोबी घाट ब्रिजकडे जाणाऱ्या गल्लीकडे जात असताना सदर दोघांनी फिर्यादी यांच्या गळ्यातील सोन्याची चैन जबरदस्तीने खेचून चोरी केली म्हणून फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून धारावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करून मिळालेल्या माहितीयाच्या आधारे १) हसन उर्फ नुर मो. शेख उर्फ पाशा आणि २) मो. रफिक हाजी मोहंमद शेख या दोघांना अटक केली. तसेच गुन्ह्यातील चोरीस गेलेली ५०,०००/- रु किंमतीची सोनसाखळी हस्तगत केली.