महाराष्ट्र

गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात…

पुणे – २ लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून त्यापैकी ३० हजार रुपयांची लाच घेताना एका पोलीस कर्मचाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांनी रंगेहात पकडले. दिपक प्रल्हाद क्षिरसागर असे याचे नाव आहे. ते पोलीस शिपाई या पदावर गुन्हे शाखा युनीट-३ पुणे येथे कार्यरत होते. तसेच त्यांच्यासोबत आणखी एका खासगी इसमास एसीबीने पकडले. सिमोन अविनाश साळवी असे याचे नाव आहे.

तक्रारदार यांच्या भावास मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात आरोपी न करणे व अटक न करण्यासाठी क्षिरसागर यांनी तक्रारदार यांच्याकडे २ लाख रु ची लाच मागणी करून त्यापैकी ३० हजार रुपये लाच रक्कम खासगी इसम साळवी यांच्या करवे स्वीकारल्यावर क्षिरसागर आणि साळवी या दोघांना एसीबीने रंगेहात पकडले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page