महाराष्ट्र
पालघर जिल्ह्यात भूकंपाचे धक्के…

पालघर – पुन्हा एकदा पालघर भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले आहे. पहाटे 4 वाजेच्या सुमारास पालघर जिल्ह्यात अनेक ठिकाणी 3.6 रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के जाणवले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे 4 वाजून 4 मिनिटांनी पालघर जिल्ह्यात 3.6 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. भूकंपाची खोली जमिनीच्या खाली 5 किमी होती. पालघर जिल्ह्यातील डहाणू, कासा, आंबोली, धानिवरी, उर्से, धुंदलवाडी, घोलवड, तलासरी, बोर्डी या परिसरात 3.6 रिश्टर स्केल तीव्रतेचे धक्के जाणवले. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.