महाराष्ट्र
लाच प्रकरणी मंडळ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात…

पालघर – मंडळ अधिकाऱ्यास १५,०००/- रुपयांची लाच स्वीकारताना अँटी करप्शन ब्युरो, ठाणे यांनी रंगेहात पकडले. सुरेंद्र काशिनाथ संखे असे यांचे नाव आहे. ते कंचाड, ता. वाडा, जि. पालघर याठिकाणी कार्यरत होते.
याबाबत वृत्त असे आहे कि, तक्रारदार यांना त्यांनी नव्याने खरेदी केलेले शेत जमिनीची फेरफार नोंद मंजुरीसाठी संखे यांनी तक्रारदार यांच्याकडे ३०,०००/- रु लाचेची मागणी करुन तडजोडी अंती २५,०००/- रुपये लाचेची मागणी केल्याने व सापळा कारवाईत तक्रारदार यांच्याकडून संखे यांनी १५,०००/- रुपये लाचेची रक्कम स्विकारल्यानंतर एसीबीने संखे यांना रंगेहाथ पकडले.