२ बांग्लादेशी, १ एजंट अटकेत…

नवी मुंबई – २ बांग्लादेशी आणि एका एजंटला अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने अटक केली आहे. दुल्लू प्रधान, फिरदोस शिकदार अशी बांगलादेशी इसमांची नावे असून, गंगाप्रसाद तिवारी असे एजंटचे नाव आहे.
हे दोन्ही बांग्लादेशी नागरीक अवैध मार्गाने भारतात प्रवेश करून नवी मुंबईतील कोपरखैरणे परिसरात बेकायदेशीररित्या राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला असता त्याठिकाणी सदर इसमांकडे भारतीय रहिवासी असल्याबाबतचे पॅन कार्ड व आधार कार्ड मिळून आले. त्यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता एजंट गंगाप्रसाद तिवारी याच्याकडून हि कार्ड बनवून घेतली असल्याचे त्यांनी संगितले. त्याप्रमाणे तिवारीला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याचेकडे आणखी पॅन कार्ड व आधार कार्ड मिळून आले तसेच नगरसेवक यांचा रबरी शिक्का व सदरचा शिक्का वापरलेले कागदपत्रे मिळून आले.
त्याप्रमाणे एजंट गंगाप्रसाद तिवारी याच्याकडे अधिक चौकशी करता त्याने नगरसेवक यांचा बनावट रबरी शिका वापरून त्या आधारे रहिवासी दाखले बनवून दुल्लू प्रधान, फिरदोस शिकदार यांना पॅन कार्ड व आधार कार्ड बनवून दिले असल्याबाबतचे सांगितले.
सदर प्रकरणी तिघांना पोलिसांनी अटक केली असून, एकूण १०९ बनावटी पॅन कार्ड व ११ बनावटी आधार कार्ड व नगरसेवक यांचा बनावट रबरी शिक्का जप्त करण्यात आला आहे. तसेच कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून, सदर गुन्ह्याचा पुढील तपास कोपरखैरणे पोलिसांकडे देण्यात आला आहे.