महाराष्ट्र
अब्दुल सत्तारांची जीभ घसरली, सुप्रिया सुळेंना शिवीगाळ!…

औरंगाबाद – कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रीया सुळे यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली आहे.
सिल्लोडमध्ये बोलताना एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही गलिच्छ भाषेत टीका केली आहे. सुप्रिया सुळेंना तुम्ही खोके देण्याची ऑफर केली होती. त्यावरुन त्यांनी तुमच्याकडे आले असतील खोके म्हणूनच तुम्ही खोके देण्यासाठी तयार झाला आहात, असं म्हटलं, यावर काय सांगाल असं सत्तार यांना पत्रकाराने प्रश्न विचारला. या वर बोलताना सत्तार यांनी सुप्रिया सुळेंचा एकेरी उल्लेख करत त्यांना शिवी घातली.