डोंबिवली
किरकोळ कारणावरून एकास मारहाण…

डोंबिवली – मोटारसायकलने कट मारण्याच्या किरकोळ कारणावरून एकास मारहाण केली असल्याचा प्रकार डोंबिवलीत घडला असून, सदर प्रकरणी चौघांविरुद्ध टिळक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जनक श्रीवास्तव, प्रेम धनगर, शाहवाज सय्यद, कृष्णा पांडे अशी या चौघांची नावे आहेत.
याबाबत वृत्त असे आहे कि, फिर्यादी विनोद यादव आणि त्यांचे मित्र मोटारसायकलवरून कचोरे पोलीस चौकी डोंबिवली पूर्वेकडे जात असताना सदर चौघांनी मोटारसायकलने कट मारण्याच्या किरकोळ कारणावरून फिर्यादी यांना शिवीगाळ करून मारहाण केली होती. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून सदर चौघांविरुद्ध टिळक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.