डोंबिवलीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग…

डोंबिवली – एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आल्याची घटना घडली असून, सदर प्रकरणी राम नगर पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. कुंदन चौहान असे याचे नाव आहे.
याबाबत वृत्त असे आहे कि कुंदन चौहान हा त्याच्या भावाच्या घरी आला होता. त्याच्या घराच्या शेजारी पीडित मुलगी आपल्या आईसह राहते. दरम्यान, मुलीची आई शेजाऱ्यांकडे गेली होती. त्यावेळी मुलीच्या भावाने मुलगी शेजारच्या घरी गेली असल्याचे आईला सांगितले. मुलीची आई लगेच शेजारच्या घरी गेली असता घरचा दरवाजा बंद होता. तेव्हा मुलीच्या आईने दरवाजा ठोठावला. त्या मुलीने रडत दरवाज उघडला आणि घडलेला प्रकार सांगितला. मुलीच्या आईने तात्काळ रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी कुंदन विरुध्द पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.