इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ला…

maharashtra – एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इम्तियाज जलील यांच्या गाडीवर नाराज कार्यकर्त्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. छत्रपती संभाजीनगर मधील बायजीपुरा येथे पदयात्रा काढत असताना ही घटना घडली.
एमआयएममधील अंतर्गत गटबाजी आणि उमेदवारी वाटपावरून जुन्या कार्यकर्त्यांमध्ये असलेली तीव्र नाराजी यातून समोर आली आहे. जलील यांच्याविरोधात घोषणाबाजी करत काळे झेंडे दाखवण्यात आले. संतप्त कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी अडवून आदळ-आपट करण्याचाही प्रयत्न केला. पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी दिल्याने जुना गट नाराज असल्याचे समोर आले आहे. असरुद्दीन ओवेसी यांची सभा होणार असताना हा प्रकार घडल्याने शहरात तणाव वाढला आहे.
दरम्यान, या घटनेवर प्रतिक्रिया देताना जलील यांनी पदयात्रा काढण्याचा आपला अधिकार असल्याचे म्हटले असून, १६ तारखेला मतपेटीतून या काळ्या झेंड्यांचा अर्थ स्पष्ट होईल, असे म्हंटले आहे.



