मुंबई
दादा म्हणजे कमाल आहे; राऊतांकडून अजित पवारांचे कौतुक…

मुंबई – खासदार संजय राऊत यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे कौतुक केले आहे. संजय राऊत यांनी एक व्हिडीओ ट्विट केला आहे. त्या व्हिडिओत अजित पवार नारायण राणे यांच्यावर टीका करताना दिसत आहेत. राऊत यांनी अजित पवार यांचा हा व्हिडीओ ट्विट करत त्यांचे कौतुक केले आहे. दादा म्हणजे कमाल आहे. कमाल की चीज!… असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.
दादा म्हणजे कमाल आहे. कमाल की चीज! नेता असाच असतो एकदम मोकळा ढाकळा! सहज सोप्या भाषेत थेट संदेश!, असे संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. या ट्विटसोबत संजय राऊत यांनी अजित पवार यांचा व्हिडीओ ट्विट केला आहे.