महाराष्ट्र

अशोक खरातला २९ मार्च पर्यंत पोलीस कोठडी…

nashik – महिलांवरील लैंगिक अत्याचार आणि इतर गंभीर आरोपांमध्ये अटकेत असलेल्या भोंदूबाबा अशोक खरातला नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयाने २९ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

झालेल्या सुनावणीत सरकारी आणि बचाव पक्षाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. सरकारी वकिलांनी तपासादरम्यान उघड झालेल्या महत्त्वाच्या बाबी न्यायालयासमोर मांडल्या. खरातच्या घरातून एक पिस्तूल आणि पाच जिवंत काडतुसे जप्त करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

तसेच मोठ्या प्रमाणात मालमत्तेशी संबंधित कागदपत्रेही पोलिसांच्या हाती लागली आहेत. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने तपासासाठी अधिक वेळ आवश्यक असल्याचे मान्य करत आरोपीला २९ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page