महाराष्ट्र

कोल्हापुरातील ज्योतिबा मंदिरात पुजाऱ्यांकडून भाविकांना मारहाण…

kolhapur – प्रसिद्ध श्रीक्षेत्र ज्योतिबा मंदिर येथील मंदिर परिसरात काही पुजाऱ्यांनी भाविकांना जोरदार मारहाण केली असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, परिते गावातील ग्रामस्थ यात्रेनिमित्त ज्योतिबा डोंगरावर सासनकाठी पूजन करायला आले होते, त्यावेळी आरती दरम्यान काही भक्तांनी हुल्लडबाजी करत आरतीमध्ये अडथळा निर्माण केला. पुजाऱ्यांच्या अंगावर गुलाल फेकणे, टोप्या

उडविणे असा हुल्लडबाजपणा सुरू केला यानंतर पुजाऱ्यांसह देवस्थानच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना समजावून सांगितले. तरीही त्यांनी ऐकून घेतले नसल्याने पुजाऱ्यांनी हुल्लडबाजी करणाऱ्यांना मारहाण केली.

सदर प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, याप्रकरणी आता पुजारी आणि भाविकांसह ३० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page