देश

बेकायदेशीर जुगार आणि बेटिंग अ‍ॅप्सवर कारवाई…

new delhi – बेकायदेशीर ऑनलाइन गेमिंग, जुगार आणि बेटिंगविरोधात केंद्र सरकारने मोठी कारवाई करत ३०० हून अधिक संकेतस्थळं आणि ऍप्स ब्लॉक केली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, या कारवाईत क्रीडा बेटिंग, ऑनलाइन जुगार, सट्टा-मटका नेटवर्क्स आणि रिअल मनी गेमिंग ऍप्सचा समावेश आहे.

ऑनलाइन गेमिंग कायदा लागू झाल्यानंतर अशा प्रकारच्या प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू असून, आता पर्यंत ८,४०० हून अधिक वेबसाइट्स ब्लॉक करण्यात आल्या आहेत.

यामध्ये प्रामुख्याने ऑनलाइन स्पोर्ट्स बेटिंग प्लॅटफॉर्म्सचा समावेश आहे, जे क्रिकेट, फुटबॉल आणि इतर मोठ्या क्रीडा स्पर्धांवर सट्टा लावण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देत होते. यासोबतच ऑनलाइन कॅसिनो, स्लॉट्स, रूलेट आणि लाईव्ह डीलर गेम्स चालवणाऱ्या वेबसाइट्सवरही बंदी घालण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, पी-२-पी (P2P) बेटिंग मार्केटप्लेस म्हणजेच ‘बेटिंग एक्स्चेंजेस’ आणि पारंपरिक सट्टा किंवा मटका चालवणारी डिजिटल नेटवर्क्स केंद्र सरकारच्या रडारवर आली आहेत. रिअल-मनी कार्ड गेम्स आणि अनधिकृत कॅसिनो गेम अ‍ॅप्सचाही यामध्ये समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page