मुंबई
अखेर रुपाली चाकणकर यांचा राजीनामा…

mumbai – रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याकडे चाकणकर यांनी राजीनामा सुपूर्द केला.
वैयक्तिक कारणाने स्वेच्छेने मी राजीनामा देत असल्याचे चाकणकर यांनी आपल्या पत्रात म्हण्टले आहे.
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातचे प्रकरण त्यांना भोवलं. भोंदूबाबा अशोक खरात याला अटक केल्यानंतर रुपाली चाकणकर यांचे खरात सोबतचे काही फोटो आणि व्हिडीओ समोर आले होते. यावरुन रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. अखेर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. .



