डोंबिवली
युवा सुत्र ‘दीपोत्सव विशेषांक’ चा प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न!…

dombivali – युवा सुत्र मराठी वृत्तपत्राचा ‘युवा सुत्र दीपोत्सव विशेषांक २०२५’ चा प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न झाला. हा सोहळा ३१ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ७ वाजता खर्डीकर क्लासेस डोंबिवली पूर्व येथे पार पडला.
कार्यक्रमाला डॉ. योगेश जोशी (साहित्यिक), हिरालाल केदारे (संपादक, साप्ताहिक मराठी नेटवर्क, ) हेमंत नेहते, अमृता पाटणकर (मुख्य संपादिका, युवा सुत्र), युवराज सुर्ले (संपादक, युवा सुत्र) डॉ. सुनील खर्डीकर (सल्लागार, युवा सुत्र), सचिन ससाणे (वरिष्ठ प्रतिनिधी, युवा सुत्र), राम सावंत, प्रतिनिधी, इतर नागरीक उपस्थित होते.
यावेळी डॉ. योगेश जोशी आणि हिरालाल केदारे यांनी आपले मनोगत व्यक्त करून युवा सुत्र टीमचे अभिनंदन केले आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.



