मुंबईत ऑडिशनच्या नावाखाली मुलांना डांबून ठेवलं…

mumbai – मुंबईतील पवई परिसरात एका व्यक्तीने ऑडिशनच्या नावाखाली मुलांना डांबून ठेवलं असल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना आर ए स्टूडियोमध्ये घडली. या स्टूडियोच्या पहिल्या मजल्यावर अभिनयाचे क्लास घेतले जातात. त्याठिकाणी १५ ते २० या मुलांना डांबून ठेवण्यात आले होते.
घटनेची माहिती मिळताच पवई पोलीस आणि NSG कमांडो घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी अग्निशमन दलाच्या मदतीने या मुलांची सुखरूप सुटका केली. आणि मुलांना डांबून ठेवणाऱ्या व्यक्तीला अटक केली. रोहित आर्या असे मुलांना डांबून ठेवणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे.
गेल्या चार-पाच दिवसांपासून येथे ऑडिशन्स सुरू होत्या, आज सकाळीही अनेक मुले आली होती, त्यातील काही मुलांना परत पाठवण्यात आले आणि उर्वरित मुलांना खोलीत बंद करण्यात आले होते. त्यानंतर घाबरलेली मुले खिडकीतून बाहेर डोकावू लागली, आणि हा प्रकार उघडकीस आला.
याचदरम्यान, रोहित आर्याने एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे ज्यामध्ये तो काही लोकांशी बोलू इच्छितो आणि जर त्याला तसे करण्याची परवानगी दिली नाही तर तो सर्वकाही पेटवून देईल आणि स्वतःला आणि मुलांना इजा करेल असे म्हटले आहे.



