प्रसिद्ध अभिनेते सतीश शाह यांचे निधन…

mumbai – बॉलिवूडचे प्रसिद्ध जेष्ठ अभिनेते सतीश शहा यांचे निधन झाले. शनिवारी (२५ ऑक्टोबर २०२५) दुपारच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ७४ वर्षांचे होते. सतीश शहा गेल्या अनेक दिवसांपासून किडनीच्या आजारामुळे त्रस्त होते. हिंदुजा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.
सतीश शाह हे हरहुन्नरी अभिनेते होते. आपल्या अनोख्या विनोदी टायमिंगसाठी ते प्रसिद्ध होते. त्यांनी २५० च्यावर हिंदी चित्रपटात काम केलं. टीव्ही सीरिअल आणि मराठी सिनेमातही त्यांनी काम केलं होतं. हिंदी मालिका-चित्रपटसृष्टीत विनोदी अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या कलाकारांपैकी एक सतीश शाह होते.
सतीश शाह यांनी दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, कल हो ना हो, मैं हूं ना आणि ओम शांती ओम या मोठ्या चित्रपटांमध्ये काम केले असून, त्यांनी या सर्व चित्रपटांमध्ये लक्षवेधी आणि स्मरणीय भूमिका साकारल्या.
दरम्यान, साराभाई वर्सेस साराभाई’मधील त्यांनी साकारलेली इंद्रवदन साराभाईची भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहे.



