सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न…

new delhi – सर्वोच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला असल्याची माहिती समोर आली आहे. एका वकिलाने गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. घटनेनंतर पोलिसांनी आरोपी वकिलाला ताबडतोब ताब्यात घेतले.
मिळालेल्या माहितीनुसार, राकेश किशोर असे या वकिलाचे नाव आहे. भर कोर्टात वकिलाने आम्ही सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही असे ओरडण्यास सुरुवात केली आणि नंतर सरन्यायाधीश गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न केला. पण, बूट त्यांच्या खंडपीठापर्यंत पोहोचला नाही. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी ताबडतोब तो बूट जप्त केला आणि वकिलाला ताब्यात घेतले.
दरम्यान, या घटनेनंतर, सरन्यायाधीशांनी न्यायालयात उपस्थित असलेल्या वकिलांना त्यांचे युक्तिवाद सुरू ठेवण्यास सांगितले. ते म्हणाले, या सर्व गोष्टींनी काळजी करू नका. मलाही काळजी नाही; या गोष्टींचा माझ्यावर परिणाम होत नाही.