सी.पी.राधाकृष्णन भारताचे नवे उपराष्ट्रपती…

new delhi – महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी राधाकृष्णन भारताचे नवे उपराष्ट्रपती झाले आहेत. सी.पी राधाकृष्णन यांनी इंडिया आघाडीच्या सुदर्शन रेड्डींचा पराभव केला. या निवडणुकीत सी पी राधाकृष्णन यांना ४५२ मतं तर सुदर्शन रेड्डी यांना ३०० मतं मिळाली आहेत. उपराष्ट्रपतिपदासाठी ९८.३ टक्के मतदान झाले.
उपराष्ट्रपतिपदासाठी आज मतदान घेण्यात आले. संध्याकाळी मतमोजणी करण्यात आली. त्यानंतर नव्या उपराष्ट्रपतींच्या नावाची घोषणा करण्यात आली.
आरोग्याच्या कारणास्तव निवृत्त उपाध्यक्ष जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा दिल्यामुळे ही निवडणूक घ्यावी लागली. निवडणूक अधिकारी आणि राज्यसभेचे सरचिटणीस पीसी मोदी यांनी पत्रकार परिषदेत निवडणूक निकालांची माहिती दिली.
सी.पी. राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ७५२ वैध मतांपैकी ४५२ पहिल्या पसंतीची मतं मिळाली आहेत. त्यामुळे, ७५२ वैध मतांपैकी ४५२ पहिल्या पसंतीच्या मतांनी त्यांचा विजय झाला असून बी. सुदर्शन रेड्डी यांना ३०० मतं पडली आहेत. या निवडणुकीत १५ मतं बाद झाली.
दरम्यान, उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी निवड मंडळात ७८२ सदस्य असतात, त्यापैकी ५४३ लोकसभेचे आणि २३९ राज्यसभेचे असतात.