उपराष्ट्रपती पदासाठी उद्या निवडणूक…

new delhi – भारताच्या उपराष्ट्रपती पदासाठी उद्या (मंगळवार दि.०९ सप्टेंबर) रोजी निवडणूक होत आहे. जगदीप धनखड यांनी आरोग्याच्या कारणास्तव तडकाफडकी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यानंतर ही निवडणूक होत आहे.
रालोआचे उमेदवार, महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन आणि इंडिया आघाडीचे उमेदवार सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांच्यात लढत होणार आहे.
देशाच्या उपराष्ट्रपती पदाची ही १७ वी निवडणूक असून, हे पद एका इलेक्टोरल कॉलेजद्वारे निवडले जाते. ज्यात लोकसभा आणि राज्यसभेच्या सदस्यांचा सहभाग असतो.
संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य या निवडणुकीत मतदान करतील. लोकसभेचे ५४२ आणि राज्यसभेचे २३९ सदस्य मिळून ७८१ सदस्य उपराष्ट्रपतीपदासाठी मतदान करणार आहेत. विजयासाठी ३९१ मतांची आवश्यकता आहे.
दरम्यान, या निवडणुकीपूर्वी, सत्ताधारी एनडीए आणि इंडिया आघाडीतर्फे आपापल्या उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.