नवी दिल्ली
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा…

new delhi – उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी काल (21 जुलै) आपल्या पदाचा राजीनामा दिला. प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्याकडे पदाचा राजीनामा सादर केला आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जगदीप धनखड यांनी राजीनामा सादर केला आहे.
राष्ट्रपतींना उद्देशून लिहिलेल्या पत्रात जगदीप धनखड यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.
त्याच पत्रात त्यांनी संविधानाच्या कलम ६७(अ) चा हवाला देऊन राजीनामा देण्याची घोषणा केली.