सांगलीतील इस्लामपूरचे नाव बदलणार…

mumbai – सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर (ता.वाळवा) शहराचे नाव ईश्वरपूर करण्यात येणार आहे. याबाबत अनेक दिवसापासून या भागातील नागरिकांची मागणी आहे. ईश्वरपूर नामकरण करण्यास शासनाने मान्यता दिली असून तसा प्रस्ताव केंद्र शासनास पाठवण्यात येत आहे, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.
मंत्री भुजबळ म्हणाले, गाव, शहर यांचे नाव बदलविण्याचे अधिकार केंद्र शासनास आहेत. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर (ता. वाळवा) चे नाव ईश्वरपूर करणेबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनास राज्य शासनाच्या शिफारशीसह पाठवण्यात येत आहे. केंद्र शासनाकडून या प्रस्तावात मान्यता मिळाल्यानंतर सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर या शहराचे नामांतर ईश्वरपूर करण्यात येईल, असेही मंत्री भुजबळ यांनी यावेळी सांगितले.