डोंबिवलीत अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम संपन्न!…

dombivali – जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त डोंबिवली पोलीस स्टेशन हद्दीत जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जनजागृती आठवडा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. त्याअनुषंगाने डोंबिवलीत विविध ठिकाणी जनजागृती कार्यक्रम संपन्न झाले.

दिनांक २४/०६/२०२५ रोजी १५:४५ वा. ते १६:३० वा. चेदरम्यान डी. एन. सी. विद्यालय, डॉचिवली पुर्व येथे सपोनि/प्रविण मुटुगडे व पोहता / गणेश गिते यांनी अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम घेतला. सदरवेळी ०२ शिक्षक, ७० ते ८० विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते.
दिनांक २५/०६/२०२५ रोजी ११:१० वा. ते १२:१५ वा. चे दरम्यान स.वा. जोशी विद्यालय व महाविद्यालय, डोंबिवली पूर्व येथे सपोनि/एल. बी. बोरा व पोड्या / गणेश गिते, पोलीस अंमलदार / अमित देसाई यांनी अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम घेतला. सदरवेळी नलावडे मुख्याध्यापक, ०७ शिक्षक, १२५ ते१५० विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते.

दिनांक २५/०६/२०२५ रोजी १५:२५ वा. ते १६.५० वा. ने दरम्यान बी. आर. मढवी कॉलेज, डोंबिवली पूर्व येथे वपोनि/गणेश जवादवाड, अमोल मडाने (नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य) व रापोनि/एल. बी. बोरा यांनी अंगली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम घेतला. रादरवेळी ०१ प्राचार्य, ०६ शिक्षक, १३० ते१५० विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना माहिती देऊन अंमली पदार्थाचे सेवनापासून परावृत्त करणेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. त्यामध्ये विद्यार्थ्यांना अनोळखी व्यक्तीकडुन बाद्य पदार्थ स्विकारु नका, एका चुकीच्या निर्णयामुळे आयुष्य बदलु शकत, अंमली पदार्थाचे सेवन हे क्षणिक समाधान देत, पण कायम स्वरुपी वेदना आणि विनाश मागे ठेवते, आई वडीलांची स्वप्न, मित्रांती साथ, स्वतःचे भविष्य सगळ संपवत, आज एक पाऊल पुढे टाका, ड्रग्जला नाही म्हणा आणि आयुष्याला हो म्हणा. अंमली पदार्थाचे सेवन म्हणजे मृत्युला आमंत्रण, चला नशा मुक्त भारत घडवूया. ‘नशा नाही, दिशा हवी’

तसेच चरस, गांजा, ड्रग्जचे सेवन करताना किंवा विक्री करताना कोणीही आढळल्यास डायल ११२ यावर माहिती द्या, आपला क्रमांक गोपनिय ठेवला जाईल असे सांगण्यात आले.
हा कार्यक्रम आशुतोष हुंबरे, पोलीस आयुक्त, ठाणे शहर, संजय जाधव, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, कल्याण, अतुल झेंडे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३, कल्याण, सुहास हेमाडे, सहायक पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग, डोंबिवली, गणेश जवादवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, डोंबिवली पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.