नवी दिल्ली
जातनिहाय जनगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय…

new delhi – केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत झालेल्या मंत्रीमंडळाच्या राजकीय विषयसंबंधी समितीच्या बैठकीत याबाबत निर्णय झाला.
माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत ही माहिती दिली. जातनिहाय लोकसंख्या पारदर्शीपणे समजावी आणि समाजात ऐक्य स्थापन व्हावं हा याचा हेतू असल्याचं वैष्णव म्हणाले.
दरम्यान , यापूर्वी १९३१ मध्ये अखेरची जातनिहाय जनगणना झाली होती. स्वातंत्र्यानंतर प्रथमच केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे.