मुंबई

बायकोकडून नवऱ्याच्या प्रेयसीची हत्या…

मुंबई – पतीचे एका महिलेसोबत प्रेमसंबंध असल्याने त्याचा राग मनात धरून पत्नीने सदर महिलेचा खून केला असल्याची घटना नेहरू नगर, कुर्ला येथे घडली असून, सदर प्रकरणी पोलिसांनी तीन महिलांना अटक केली.

याबाबत वृत्त असे आहे कि, नेहरूनगर येथील नाल्यात एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला होता. सदर प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गु.र.क्र. ५२१ /२०२२ कलम ३०२, २०१ भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्हयाच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे नवजीवन रहिवाशी संघ, विमोचीत सोसायटी कुर्ला (पूर्व) मुंबई येथून दोन संशयित महिलांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत मिनल पवार हिच्या पतीचे मयत महिलेशी प्रेमसंबंध असल्याने त्याचा राग मनात धरून मिनल पवार हिने तिची बहिण शिल्पा पवार आणि इतर साथीदार महिला प्रज्ञा उर्फ डॉली भालेराव यांच्या मदतीने कट रचून सदर महिलेचा गळा आवळून तिला जीवे ठार मारून तिचा मृतदेह गोणीत भरून नेहरूनगर, कुर्ला पूर्व, मुंबई येथील नाल्यात टाकून दिल्याचे सांगितले.

दरम्यान, पोलिसांनी तीन महिलांना अटक केली असून, पुढील तपास सुरु आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page