डोंबिवली

डोंबिवलीतील गुन्हेगाराची नाशिकरोड कारागृहात रवानगी…

dombivali – डोंबिवली पोलीस स्टेशन हद्दीतील रेकॉर्डवरील शेलारनाका परिसरात राहणारा गुन्हेगार गणेश बाळु अहिरे उर्फ गटल्या याला डोंबिवली पोलिसांनी MPDA कायद्याअंतर्गत १ वर्षासाठी स्थानबद्ध केले असून, त्याची रवानगी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह, नाशिक येथे करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गणेश बाळु अहिरे उर्फ गटल्या याच्यावर शिवीगाळी, दमदाटी करून मारहाण करणे, घातक शस्त्र वापरुन दंगा करणे, घातक शस्त्र जवळ बाळगणे व जीवे ठार मारण्याची धमकी देणे असे डोंबिवली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. तसेच त्याच्या गुन्हेगारीस आळा बसण्याकरीता CRPC १०७ व ११० प्रमाणे प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती, त्या प्रतिबंधक कारवाईस तो दाद देत नसल्याने, गुन्हेगारी कृत्य चालूच ठेवल्याने त्याच्या कृत्यांना आळा घालण्यासाठी त्यास १८ महीने कालावधी करीता तडीपार करण्यात आले होते.

तरीपण सदर गणेश तडीपार आदेशाचे उल्लंघन करून, पुन्हा त्यास प्रतिबंध केलेल्या परिसरात येऊन गुन्हे करू लागल्याने तसेच डोंबिवली पोलीस स्टेशन हद्दीतील लोकांमध्ये दहशत निर्माण करून त्याची या परिसरात दहशत निर्माण झाल्यामुळे या परिसरातील सर्वसामान्य नागरीकांचे जीवन जगणे धोक्यात येत असल्याने, सार्वजनिक शांततेस बाधक ठरत असल्याने, गणेश बाळु अहिरे उर्फ गटल्या यावर MPDA कायद्यांतर्गत १ वर्षांसाठी जेलमध्ये स्थानबध्द करण्यासाठी डोंबिवली पोलीस स्टेशन तर्फे पोलीस आयुक्त, ठाणे शहर यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता, त्यावरून आशुतोष डुंबरे, पोलीस आयुक्त, ठाणे शहर यांनी गणेशला १ वर्षांसाठी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह, नाशिक येथे स्थानबध्द करण्याचे आदेश काढल्याने डोंबिवली पोलिसांनी गणेशाला ताब्यात घेऊन त्यास नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह, नाशिक येथे १ वर्षासाठी स्थानबद्ध केले आहे.

तसेच डोंबिवली पोलीस स्टेशन तर्फे रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर गेल्या वर्षभरात ४ मोक्का, २ MPDA व ११ आरोपींवर तडीपार कारवाई करण्यात आली असून, त्यात १३ आरोपी जेलमध्ये आहेत. तसेच डोंबिवली पोलीस ठाणे अंतर्गत आज पावेतो एकूण १० मोक्का ची कारवाई करून २४ आरोपी जेलमध्ये आहेत. आणि MPDA कायद्यांतर्गत २ आरोपी स्थानबध्द करण्यात आले आहे.

दरम्यान, ज्योतीनगर, शेलारनाका, आंबेडकर वसाहत, त्रिमुर्तीनगर, इंदिरानगर, दत्तनगर व आवरेगाव या भागातील रेकॉर्डवरील बऱ्याच गुन्हेगार यांचेवर तडीपार, मोक्का व MPDA कायद्यांतर्गत कारवाई करण्यासाठी छाननी चालू आहे.

आपण राहत असलेल्या परिसरात गुन्हेगारी वृत्तीचे इसम जर त्रास देत असतील, तर डोंबिवली पोलीस ठाण्यात येऊन समक्ष आम्हाला माहीती द्यावी. असे आवाहन डोंबिवली पोलीस ठाण्याकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page