मुंबई
शहापूरजवळ ५ वाहनांचा विचित्र अपघात…

मुंबई – नाशिक महामार्गावर पाच वाहनांचा भीषण अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातामध्ये ३ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर १२ ते १३ जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीच्या सुमारास मुंबई – नाशिक महामार्गावरील शहापूर गोठेघरजवळ कंटेनर, ट्रक आणि खासगी बस एकमेकांना धडकल्याने हा अपघात झाला.