नवी दिल्ली
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं…
new delhi – दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तारखेची घोषणा करण्यात आली आहे. येत्या ५ फेब्रुवारीला मतदान होणार असून, मतमोजणी ८ फेब्रुवारीला होणार आहे. आज केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी या संदर्भातली माहिती दिली
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी एकाच टप्प्यामध्ये मतदान होणार आहे.
उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख – १७ जानेवारी २०२५
उमेदवारी अर्जाची छाननी – १८ जानेवारी २०२५
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख – २० जानेवारी २०२५
मतदानाची तारीख – ५ फेब्रुवारी २०२५
मतमोजणीचा दिवस – ८ फेब्रुवारी २०२५
.